आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे भुसावळ येथे कृष्णचंद्र सभागृहामध्ये जागतिक महिला दिवस साजरा झाला.अपर मंडळ रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमनयांचे हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, महिला कल्याण समितीच्या सचिव स्मिता गरड उपस्थित होत्या. जळगाव येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ.नीलेश चांडक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रद्धा चांडक यांनी महिलांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी? ही माहिती दिली.
यावेळी रंगोळी, नृत्य, गीतगायन, समूहनृत्य, फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. गोपाल जोनवाल यांनी सपत्निक आत्मसरंक्षणाचे प्रात्याक्षिक दाखवले. मेडिटेशनचे धामिका इंगले, भारती ठोके, संगीता दवारे, अजय इंगले, डॉ.पराग पाटील यांनी सहकार्य केले. सुनीलकुमार सुमन, एन.एस.काझी या अधिकाऱ्यांनी संवाद साधला. संपूर्ण भुसावळ विभागातून ३६ महिलांना चांगले कार्य केल्याबद्दल प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेमधील विजेत्यांचा अपर मंडल रेल प्रबंधक सुनीलकुमार सुमन यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.