आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना महाबळेश्वरचा अनुभव:दिवसा थंडीत घट, किमान‎ तापमान आता 15 अंशांवर‎

भुसावळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दाेन दिवसाच्या तुलनेत‎ दिवसा वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचे‎ प्रमाण घटल्याचा अनुभव शुक्रवारी‎ आला. हवामान खात्याकडील‎ नाेंदीनुसार भुसावळच्या कमाल‎ तापमानात किंचित वाढ झाली. दाेन‎ दिवसानंतर सूर्यदर्शन झाले. मात्र,‎ दिवसभर वातावरणातील बदल‎ सुरूच हाेते. तुलनेत दिवसाच्या‎ थंडीत घट झाली हाेती.‎ गेल्या दाेन दिवसांपासून‎ नागरिकांना महाबळेश्वरचा अनुभव‎ येताे आहे. राज्यातील सर्वात थंड‎ शहरापेक्षाही गारठलेले शहर म्हणून‎ भुसावळची नाेंद झाली. राज्यात‎ सर्वाधिक कमी तापमानाची नाेंद‎ झाल्याने जनजीवनावर परिणाम‎ झाले हाेते. दरम्यान दाेन दिवसानंतर‎ वातावरणात बदल झाला.‎ गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी‎ दिवसाचे वातावरण निवळले हाेते.‎ हवामान विभागाच्या नाेंदीनुसार‎ कमाल तापमान २२.९ अंश‎ सेल्सिअस तर किमान तापमान १५.२‎ अंश सेल्सिअस हाेते. आगामी तीन‎ दिवसांत रात्रीच्या तापमानात‎ आणखी घट हाेण्याची शक्यता‎ आहे. पुढच्या आठवड्यात साेमवार‎ व मंगळवारी किमान तापमानात नऊ‎ अंशापर्यंत घट हाेण्याची शक्यता‎ आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारपर्यंत‎ सातत्याने वातावरणातील बदल सुरू‎ हाेते. दुपारनंतर बराच वेळ सूर्यदर्शन‎ झाले. सायंकाळनंतर पुन्हा थंडीत‎ वाढ झाली हाेती. आणखी काही‎ दिवस अशीच स्थिती राहणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...