आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हिवाळ्यात कोरडा आहार टाळावा, तेलाने मालिश केल्यास कमी होईल त्वचेचा रुक्षपणा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात तापमानाचा पारा कमी होऊन थंडी वाढताच दम्यासारखे श्वसन विकार, काही त्वचा विकार डोके वर काढतात. लहान मुलांसह वयोवृद्धांच्या आरोग्याला थंडी बाधक ठरते. अशावेळी अगदी साधेसुधे पथ्ये पाळली तर आपण उत्तम आरोग्य राखू शकतो. अंघोळीनंतर खोबरेल तेलाने मालिश केल्यास त्वचेचा रुक्षपणा कमी करता येतो. शिवाय आहारात ड्रायफ्रूट, शुद्ध तुपासारखे स्निग्ध पदार्थ वापरल्यास शरीराला ऊर्जा मिळते. नियमित व्यायाम, योगासने देखील फायदेशीर ठरतात. या पद्धतीने नेमकी काय खबरदारी घ्यावी, याविषयी शहरातील त्वचारोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञांनी दिलेला सल्ला पुढीलप्रमाणे.

थंडी वाढताच दमा रुग्णांना कफाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे उबदार कपडे वापरावे. सिताफळ, केळी, संत्री खाणे टाळावे. आहारात उष्णपदार्थांचा समावेश करावा. हिवाळ्यात भूक वाढते. त्यामुळे ड्रायफ्रूट, डिंकाचे लाडू, आवळा व आवळ्याच्या पदार्थांचे सेवन करावे. शुद्ध तेल, तुपाचे मर्यादेत सेवन करावे. कोरडा आहार टाळावा. अन्यथा गुद््विकार होऊ शकतो. कोवळ्या उन्हात शरीराला तेलाने मालिश करावी. यामुळे त्वचा रुक्ष होणार नाही. नियमित व्यायाम करावा. वात विकार असलेल्यांनी दररोज दोन चमचे खाेबरे तेलाचे सेवन करणे उत्तम ठरेल. डाॅ. महेश चाैधरी, आयुर्वेद तज्ज्ञ

थंडीच्या दिवसात बालदम्याचा त्रास वाढू शकतो. लहान मुलांमध्ये श्वसनासंबंधी विकार वाढतात. तसेच लहान मुलांची त्वचा या दिवसात लाल, रुक्ष हाेते. अंगाला खाज येते, ही लक्षणे विशेष करून एक वर्षाच्या आतील मुलांना जास्त हाेत असतात. त्यामुळे मुलांच्या शरीराला योग्य क्रीम लावावे. बाहेरील काही पदार्थ खाण्यास देऊ नये. हिवाळी डायरिया देखील होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी पाणी उकळून गार केलेले वापरावे. थंड पदार्थ देखील वर्ज करून मुलांना अंगभर व उबदार कपडे घालावे. मुलांना या दिवसात भरपूर पाणी पिण्यास द्यावे. डाॅ. पंकज राणे, बालराेग तज्ज्ञ

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे शरीरातील पाणी पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. थंडीने लहान मुलांच्या चेहरा, हातावर चट्टे पडतात. त्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून दोन ते तीन वेळा क्रीम वापरावे. आंघाेळीवेळी साबण वापरण्याचे प्रमाण कमी करावे. अंघोळीनंतर शरीराला खोबरेल तेल लावावे. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी हाेते. खाण्यात स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर करावा. थंडीने ओठ फाटतात, त्यासाठी लिफ बाम वापरता येईल. या दिवसात साेरीयासिस आजार वाढीची भीती पाहता त्वचा राेगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डाॅ.प्रतिभा बाेराेले, त्वचाराेग तज्ज्ञा

बातम्या आणखी आहेत...