आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई:कोरेाना काळात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे; दीपनगर कोळसा वाहतूक रेल्वे लाइनच्या दुतर्फा सर्रास वृक्षतोड

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेाना काळात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे सर्वांना वृक्षांचे महत्त्व पटले. त्यामुळे अनेक व्यक्ती, संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी हातभार लावणे सुरू केले आहे. असे असले तरी दुसरीकडे अवैध वृक्षतोडीचे प्रकार सुरु आहेत. भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारात वरणगाव ते दीपनगरपर्यंत कोळसा वाहतुकीसाठी टाकलेल्या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. याकडे वन विभागासह शासनाच्या सर्वच विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.

गावठाण व माळरान असलेल्या हा भाग महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे वृक्षतोडीनंतर लाकडांची खुलेआम वाहतूक केली जाते. अवैध वृक्षतोड थांबवण्याची जबाबदारी महसूल, वन विभाग, पोलिस व स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. पण, एकही जण पुढे येत नाही. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्या माफियांना अभय कुणाचे? असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...