आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दादर-बलिया-दादर, दादर-गोरखपूर-दादर, मनमाड-दादर-मनमाड आणि एलटीटी-बल्लारशाह-एलट ीटी या विशेष गाड्यांचा चालवण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. यात दादर-बलिया ही गाडी २ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान २५ फेऱ्या करेल. ही गाडी आठवड्यातून साेमवार, बुधवार, शुक्रवारी दादर येथून सुटेल. तर बलिया येथून ही गाडी दादरसाठी ४ जानेवारी ते १ मार्चपर्यंत २५ फेऱ्या करेल. ही गाडी बलिया येथून दर बुधवार, शुक्रवार, रविवारी धावेल. दादर-गाेरखपूर गाडी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत धावेल. ही गाडी दादर येथून दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी सुटेल.
तर गोरखपूर येथून ही गाडी २ जानेवारी ते २ मार्चपर्यंत ३४ फेऱ्या करणार आहे. ही गाडी साेमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवारी गोरखपूर येथून सुटेल. मनमाड-दादर विशेष गाडी ६ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येईल. ही गाडी गुरूवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. दादर-मनमाड ही विशेष गाडी ६ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत धावेल. ही गाडी गुरूवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. एलटीटी-बल्लारशाह गाडी १० जानेवारी ते २८ मार्चपर्यंत धावेल. ही साप्ताहिक गाडी दर मंगळवारी एलटीटीवरून, तर बल्लारशाह येथून एलटीटीसाठी दर बुधवारी सुटेल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.