आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गेल्या २० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने, शिवसेना (ठाकरे गट) शहप्रमुख संतोष माळी यांनी वॉर्डातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरद्वारे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा केला. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. उन्हाळाच्या सुरुवातीलाच वरणगाव शहरात पाणी टंचाईने नागरीकांची अडचण वाढली आहे. शहरातील हातपंपदेखील नादुरुस्त असल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. हातपंप वॉर्डावॉर्डात आहे, परंतु ते नादुरुस्त आहे.
याकडे नगरपालिकेने लक्ष दिल्यास टंचाईच्या काळात दिलासा मिळू शकतो. टंचाई संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपरिषदेत बोंबाबोंब आंदोलन केले. तात्काळ पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत, हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शिवसेना शहप्रमुख संतोष माळी यांनी, शुक्रवारी सकाळी वॉर्डात स्वखर्चाने पाण्याचे टँकर आणून पुरवठा केला.
समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशासकांच्या काळात वरणगाव नगरपरिषदनेनागर िकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप, संतोष माळी यांनी केला. प्रशासनाने लक्ष घालून वरणगावकरांना समस्येतून मुक्त करावे अशी मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.