आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके‎ भुईसपाट:अवकाळी पावसामुळे‎ केळी, गहू, मका आडवा‎

भुसावळ‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पूर्व भागात शनिवारी‎ रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान‎ वादळी पावसाने हजेरी लावली.‎ त्यामुळे वेल्हाळे, मन्यारखेडा,‎ जाडगाव, साकरी, कठोरा या‎ भागात केळी, मका, गहू आदी पिके‎ भुईसपाट झाली. तर हतनूर येथे‎ विज कोसळून दोन म्हशी दगावल्या.‎ याबाबत पशुवैद्यकीय विभागाने‎ पंचनामे केले. किती क्षेत्रावरील‎ नुकसानीचे पंचनामे झाले याची‎ माहिती मात्र तहसील कार्यालयाकडे‎ उपलब्ध झाली नाही.

किमान ४०‎ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा‎ अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.‎ अर्धा तास सुरु असलेल्या‎ वादळी पावसामुळे वेल्हाळे भागात‎ सर्वाधिक नुकसान झाले. वेल्हाळे‎ शिवारातील त्रिलोत्तम ढाके,‎ धनराज ढाके, बाळू पंडीत ढाके,‎ हिरामण प्रल्हाद पाटील, गोपाळ‎ पाटील, सुभाष चुडामण पाटील,‎ जितेंद्र ढाके आदी शेतकऱ्यांचे मका‎ पिकआडवे झाले.

दोन म्हशी दगावल्या‎
हतनूर गावातील सुपडू दयाराम‎ पाटील यांच्या घराजवळच म्हशींचा‎ गोठा आहे. शनिवारी रात्री १२.१५‎ वाजेच्या दरम्यान घर व गोठ्यावर‎ विज कोसळूनदोन म्हशी दगावल्या.‎ तर घराच्या भिंतीला तडे जाऊन‎ वीज केबलचे नुकसान झाले. मृत‎ म्हशींचे पंचनामेपशुवैद् यकिय‎ अधिकारी डॉ. सतीश तायडे,‎ तलाठी निता झायले यांनी केले,‎ अशी माहिती प्रभारी तहसीलदार‎ महेश पवार यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...