आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाला मिळाली पोलिस कोठडी:वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर पकडले

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सुंदर नगर भागात अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर आणि चालकाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. साडेतीन लाखांचे डंपर आणि १६ हजारांची २ ब्रास वाळू असा ३ लाख ६४ हजार रूपयांचा हा मुद्देमाल आहे. चालक गजानन जावरे याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर मंगळवारपर्यंत (दि.६) पाेलिस कोठडी मिळाली.

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अतुल श्रावण कुमावत हे रविवारी (दि.४) पहाटे चार वाजता गस्तीवर होते. सुंदर नगर भागात वाळूची वाहतूक करणारे डंपर (एमएच.१९-सीवाय.६४५६) थांबवून त्यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली.

मात्र, त्याच्याकडे परवाना नव्हता. डंपरमध्ये दोन ब्रास वाळू क्षमतेपेक्षा जास्त हाेती. यामुळे डंपर जप्त करण्यात आले. कुमावत यांच्या फिर्यादीवरून चालक गजानन पंडित जावरे (रा.साकेगाव, ता.भुसावळ) याचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हवालदार नीलेश चौधरी तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...