आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथसंचलन:भुसावळात दसरा उत्सव; 390 स्वयंसेवकांचा सहभाग

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला उन्नत राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असून संघाने आगामी काळात पर्यावरण, जलसंवर्धन, बेरोजगार युवकांचे स्वावलंबन यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्ष असल्याचे प्रतिपादन, देवगिरी प्रांताचे बौद्धिक प्रमुख श्रीरंग गोसावी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बुधवारी भुसावळ हायस्कूल मैदानावर झालेल्या दसरा उत्सव समारोप प्रसंगी ते बोलत होते. पथसंचलनात ३९० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला.

यावेळी व्यासपीठावर बीएनए इन्फास्ट्रक्चरचे संचालक मिलिंद अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भुसावळ जिल्हा संघचालक डॉ. विजयकुमार सोनी, शहर संघचालक डॉ. विरेंद्र झांबरे, कार्यवाह प्रसाद पांडे उपस्थित होते. शहरातील जामनेररोडवरील आहिल्यादेवी कन्या विद्यालयापासून रा.स्व. संघाच्या पथसंचलनाला सुरवात झाली. तर भुसावळ हायस्कूल मैदानावर संचलनाचा समारोप झाला.

यावेळी बौध्दीक प्रमुख श्रीरंग गोसावी यांनी पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, युवकांचे स्वावलंबन आदी विषयांवर कार्य केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले. देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असून देश उन्नत राष्ट्र म्हणून उदयास येईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. समारोपावेळी आमदार संजय सावकारे, मनोज बियाणी, युवराज लोणारी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, अजय भोळे, परिक्षीत बऱ्हाटे आदींसह भाजपचे पदाधिकारी होते.

सव्वा वर्षाचा स्वयंसेवक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात भुसावळातील अवघ्या सव्वा वर्षांचा संघ संकीत सुराणा हा वडील व आजोबांसोबत सहभागी झाला होता.

या मार्गाने पथसंचलन
आहिल्यादेवी कन्या विद्यालयात प्रार्थनेनंतर पथसंचलनाला सुरुवात झाली. जामनेररोड, गंगाराम प्लॉट, अप्सरा चौक, मरिमाता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, भजेगल्ली, जाममोहल्ला मशिद, डॉ. आंबेडकर पुतळा, मॉर्डनरोड, राममंदिर वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाजारपेठ पोलिस ठाणे, गरुड प्लॉट, म्युनिसीपल पार्क, जळगावरोड, भुसावळ हायस्कूल येथे समारोप झाला.

पथसंचलनावर केली पुष्पवृष्टी
पथसंचलनावर मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड आदी ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. अंत्यत शिस्तबध्द पथसंचलनात घोष पथकासह तब्बल ३९० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. तर समारोपावेळी तब्बल ४५० स्वयंसेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...