आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:डीवायएसपींची बेशिस्त वाहनधारकांवर स्वत: कारवाई‎‎

भुसावळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत टाॅकीज ते लाेखंडी पुलापर्यंत‎ रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग व‎ हातगाड्यांमुळे रहदारीला अडथळे‎ येतात. यामुळे डीवायएसपी साेमनाथ‎ वाघचाैरे यांनी बुधवारी रात्री ८.३०‎ वाजता स्वत: कारवाई केली.‎ डीवायएसपींना कारवाई करताना पाहून‎ वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देखील‎ धाव घेतली.‎ बुधवारी रात्री ८.३० वाजता‎ डीवायएसपी वाघचाैरे वसंत टॉकीज‎ परिसरातून जात होते.

यावेळी बेशिस्त‎ पार्किंग, हातगाड्या पाहून त्यांनी‎ माेटरसायकल धारकांची कानउघाडणी‎ केली. ही खबर लागताच पालिका‎ दवाखान्याजवळ आलेल्या शहर‎ वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन‎ मालकांवर कारवाई केली. यामुळे‎ अनेकांनी काढता पाय घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...