आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यवाही:तहसीलमध्ये ई-चावडी चे काम सुरू; सुटीचा त्याग करून यावलला तलाठी वर्गाकडून नियमित कामकाज

यावल15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई चावडीचे कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत संपूर्ण तलाठी वर्गास तहसील कार्यालयाच्या सभागृहात बोलावून त्या ठिकाणी ई चावडीचे संपूर्ण कामकाज केले जात आहे. जलद गतीने ई चावडीचे कामकाज व्हावे यासाठी तहसीलदार महेश पवार प्रयत्नशील आहेत.तालुक्यातील तलाठी सजा कार्यालयाचे संपूर्ण दप्तर संगणकीकृत व्हावे याकरिता इ चावडी हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. ई चावडीच्या माध्यमातून संपूर्ण तलाठी सजा कार्यालयातील दस्तऐवज हे संगणकीकृत होतील, तेव्हा या संपूर्ण दस्ताऐवजांची पडताळणी करून सर्व दस्ताऐवज खात्रीपूर्वक संगणकीकृत व्हावे यासाठी कार्यवाही सुरू आहे.

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात तलाठी वर्गास बोलावून ई चावडीचे कामकाज केले जात आहे. सभागृहामध्ये संपूर्ण तलाठ्यांची विशेष बैठक व्यवस्था करून त्यांच्यासोबत कोतवालांची मदत घेत ई चावडीमध्ये संपूर्ण तलाठी सजा कार्यालयातील दस्ताऐवज व्यवस्थित अपलोड केले आहेत किंवा नाही याची पडताळणी आणि अपलोडिंगचे काम हाती घेतले आहे. ई चावडीमध्ये संपूर्ण तालुक्याचे कामकाज हे १०० टक्के व्हावे असे प्रयत्न आहेत.

संगणकीकृत होतील, तेव्हा या संपूर्ण दस्ताऐवजांची पडताळणी करून सर्व दस्ताऐवज खात्रीपूर्वक संगणकीकृत व्हावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात तलाठी वर्गास बोलावून ई चावडीचे कामकाज केले जात आहे. सभागृहामध्ये संपूर्ण तलाठ्यांची विशेष बैठक व्यवस्था करून त्यांच्यासोबत कोतवालांची मदत घेत ई चावडीमध्ये संपूर्ण तलाठी सजा कार्यालयातील दस्ताऐवज व्यवस्थित अपलोड केले आहेत किंवा नाही याची पडताळणी आणि अपलोडिंगचे काम हाती घेतले आहे. ई चावडीमध्ये संपूर्ण तालुक्याचे कामकाज हे १०० टक्के व्हावे असे प्रयत्न आहेत.

शेतकरी हिताला प्राधान्य
सुटीच्या दिवशीही संपूर्ण तलाठी तहसील कार्यालयामध्ये थांबून या प्रकल्पाचे कामकाज करतात. सुटी असल्याने शासकीय संकेत स्थळावर जलद गतीने काम होते. त्यामुळे शेतकरी हितासाठी संपूर्ण चावडी ऑनलाइन कशी होईल, यासाठी तलाठीही परिश्रम घेताहेत.

बातम्या आणखी आहेत...