आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तहसील कार्यालयात आगामी महसुली वर्षात राबवण्यात येणाऱ्या ई-चावडी उपक्रमाचे प्रशिक्षण व ऑनलाइन डाटा नोंदणी, दुरुस्ती शिबिर सुरू झाले आहे. त्यात तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर मंडलाधिकारी सचिन जगताप हे प्रशिक्षण देत आहेत. येणाऱ्या महसूल वर्षात संपूर्ण चावडी संगणकीकृत होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात सातबारा संगणकीकृत झाला. त्यापुढील टप्प्यात आता संपूर्ण चावडी ई-चावडी व्हावी म्हणून प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे. त्यासाठी यावल येथील तहसील कार्यालयात प्रशिक्षण व नोंदणी, क्षेत्र दुरुस्ती शिबिर सुरू आहे. यात तालुक्यातील सर्व ६७ ग्रामपंचायत क्षेत्रातील ८६ गावातील ऑनलाईन नोंदणी कशा घ्याव्यात? यासाठी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर मंडलाधिकारी सचिन जगताप हे सर्व तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
प्रामुख्याने गावाचे क्षेत्र जुळवताना प्रत्येक गटनिहाय क्षेत्र जुन्या आकारबंधाशी पडताळून पाहणे, गट नंबर नसलेल्या सातबाराला गट नंबर देणे, तलाठी दप्तरातील गाव नमुना अपडेट करणे, गावाचे क्षेत्र जुळवणे, सातबारातील चुका दुरुस्ती कशी करावी? याची माहिती जगताप देत आहेत. त्यानुसार शासनाच्या संकेतस्थळावर माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे. ई-चावडी उपक्रम येणाऱ्या महसूल वर्षात राबवले जाणार आहे. त्यापूर्वी ई-चावडी पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी दररोज येथील तहसील कार्यालयाच्या विविध ठिकाणी संगणक, लॅपटॉपद्वारे दिवसभर ऑनलाइन कामकाज केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.