आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पाच दिवसांत सोयाबीन खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर १४ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याची तुलना करता सूर्यफुल तेल १२ ते १५ रुपयांनी घसरले आहे. यामुळे गृहिणींना काही अंशी दिलासा मिळाला. शेंगदाणा तेल मात्र १६२ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. या दरात पुन्हा घसरण होईल, अशी आशा असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारावर दर अवलंबून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटवल्याने तेल आवाक्यात येत आहे. मागील पाच दिवसांत सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या दरात दर प्रतिलिटर १२ ते १५ रुपयांची घसरण झाली. दरम्यान, खाद्यतेल दरवाढीमुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम झाले होते. गेल्या आठवड्यात सोयाबीन तेल १५५ रुपये लिटर होते. ते आता १४१ रुपये लिटर आहे. म्हणजे भाव १४ रुपयांनी कमी झाले. सूर्यफूल तेल गेल्या आठवड्यात १९५ रुपये लिटर होते, ते सध्या १८२ ते १८५ दरम्यान आहे.
सीमा शुल्क कपातीने मिळाला आहे दिलासा ^केंद्र सरकारने गेल्या काळात खाद्यतेलांवरील सीमा शुल्कात कपात केली. इंडोनेशियाने निर्यात बंदी हटवल्याने खाद्य तेलांचे दर कमी झाले. दीड महिन्यापासून तेलाची मागणी कमी झाली आहे. आगामी काळात दर वाढतील किंवा कमी होतील? हे तूर्त सांगता येणार नाही. पाऊस, शासनाचे धोरण आदींवर ते अवलंबून असेल. निर्मल कोठारी, व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.