आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्त गुण ओळखून संधी:शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारींचा सल्ला, जिजामाता विद्यामंदिरात बक्षीस वितरण‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत‎ असताना त्यांच्यामधील सुप्त गुण‎ ओळखून त्यांना संधी देणे महत्त्वाचे‎ असते. प्रत्येक बालक हे एक स्वतंत्र‎ व्यक्तिमत्व असते. त्याची जोपासना‎ करण्यासाठी पालकांनी सतर्क राहणे‎ गरजेचे आहे, असे मत जळगाव‎ येथील शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी‎ यांनी व्यक्त केले. श्री. संत ज्ञानेश्वर‎ शिक्षण मंडळ संचलित जिजामाता‎ प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक‎ पारितोषिक वितरण समारंभ‎ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख‎ पाहूणे म्हणून ते बोलत होते.‎

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ संस्थाअध्यक्ष महेंद्र मांडे, शालेय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समिती सदस्य मंगला वाणी होते.‎ जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात‎ वर्षभरात संपन्न झालेल्या क्रीडा‎ स्पर्धा तसेच विविध शारिरीक आणि‎ बौध्दिक स्पर्धांमध्ये प्राविण्य‎ मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना‎ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते‎ पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र मांडे यांनी‎ विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन‎ यावेळी केले. अहवाल वाचन‎ शाळेच्या मुख्याध्यापिका अलका‎ सुरवाडे यांनी केले. यादी वाचन‎ स्मिता जोशी यांनी केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय‎ अहिरराव यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...