आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावे:निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, रावेर तालुक्यात तयारी मात्र पुढील विधानसभेची; मेळावे, बैठकांतून साखरपेरणी सुरू

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यादृष्टीने काही राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, शिवसेना व प्रहार जनशक्तीने विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आतापासून तयारी सुरु केली असल्याचे या दोन्ही पक्षाच्या मेळाव्यांवरुन स्पष्ट होते. या दोन्ही पक्षांनी संघटन वाढीसाठी रावेरात बीज पेरणी केली. विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी शिल्लक असला तरी राज्यमंत्री बच्छू कडू व शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या रावेर तालुक्यातील दौऱ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. रावेर विधानसभा मतदार संघाचे पुढील आमदार अनिल चौधरी असतील असे राज्य मंत्री कडू यांनी भाकीत वर्तवले तर शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात बोलतांना माझ्यावर जबाबदारी दिल्यास रावेर मतदार संघातून पुढील आमदार शिवसेनेचा असेल असे विधान आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांची रावेर विधानसभा मतदारसंघावर नजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठीच आतापासून तयारी त्यांनी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या अनिल चौधरी यांनी सुमारे ४२ हजार मते घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

जबाबदारी द्या, रावेरात शिवसेनेचा आमदार आणतो : चंद्रकांत पाटील पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने शिवसेना शिव संपर्क अभियान राबवत आहे. या अभियानासाठी पक्षाचे खासदार धैर्यशील माने शुक्रवारी येथे आले होते. यावेळी झालेल्या मेळाव्यात बोलतांना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिल्यास रावेर विधानसभेची जागा मी निवडून आणून देतो असे सूतोवाच मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करीत राजकारणात हवा भरली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत निरोप द्या अशी विनंती खासदार माने यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे. भाजपच्या गोटात हालचाली नाही, काँग्रेस आमदारांचा कामांवर भर आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा मतदार संघात विविध विकास कामे करण्यावर भर दिला आहे. त्यांनी त्यांचे पूत्र धनंजय यालाही मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यादृष्टीने ते विविध ठिकाणी भेटीगाठी घेताना दिसतात. दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र सध्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. अपवाद केवळ दोन दिवसांपूर्वी झालेला मेळावा ठरला. उद्योजक श्रीराम पाटील हे सुध्दा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून सातत्याने त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातर्फे की अपक्ष लढतात हे निश्चित नाही.

बातम्या आणखी आहेत...