आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील वीज कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर आहेत. या संपात भुसावळ शहर व तालुक्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या ३० संघटनांचे सदस्य कर्मचारी सहभागी होतील. दीपनगर औष्णिक केंद्रातही महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती संपात सहभागी होईल. याबाबत संघर्ष समितीने मंगळवारी द्वारसभा घेऊन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना निवेदन दिले. वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेले आंदोलन व संपाबाबत महाराष्ट्र शासनाचे प्रधान उर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, इतर अधिकारी, संघर्ष समितीमधील ३१ संघटनांची बैठक बांद्रा येथे झाली. पण, त्यात तोडगा निघाला नाही. यामुळे वीज कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
पर्यायी व्यवस्था : अडचण आल्यास येथे साधा संपर्क महावितरणने शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. आहे. शहरातील नाहाटा, तापीनगर, औद्योगिक वसाहत आदी सबस्टेशनमध्ये ठेकेदारीतील ऑपरेटर असतील. शहरातील तक्रारी सोडवण्यासाठी देखील वायरमन, तंत्रज्ञ असे ठेकेदाराचे कर्मचारी सेवा देतील , अशी माहिती महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांनी दिली. ग्राहकांनी तक्रारींसाठी उपविभाग व फ्यूज कॉल सेंटरसाठी अनुक्रमे शिवाजी नगर 8411968539, डीएस ग्राऊंड 8411968372, पीसी युनिट 8411968326, एसबी युनिट 8411968538 येथे संपर्क साधावा.
खासगीकरणाला विरोध महावितरण कंपनीच्या नफ्याच्या भागामध्ये अदानीसारख्या खासगी भांडवलदारांचा समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आंदोलनाची उभारणी झाली. त्यात दीनगर औष्णीक केंद्रातील संघर्ष समितीने देखील संपात उडी घेतली आहे. यामुळे मुख्य अभियंत्यांना पत्र दिले. दरम्यान, वीज कामगारांनी पुकारलेल्या संपाला मनसेने पाठिंबा दिला. जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांनी माहिती दिली .
दीपनगरात द्वारसभा संपामध्ये कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षकांनी १०० टक्के (मुख्य कार्यालय ते शाखा कार्यालय, निर्मिती केंद्र, उपकेंद्र) सहभागी व्हावे याबाबत आवाहन करण्यासाठी दीपनगरात मंगळवारी द्वारसभा झाली. उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, प्रशिक्षणार्थी अभियंते, अप्रेंटिस व ग्रामविद्युत सहाय्यकांनी संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.