आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचण्या वाढल्या:कोरोनाचे सर्वाधिक 9 रुग्ण असलेल्या भुसावळात चाचण्या वाढवण्यावर भर

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहर आणि तालुक्यात सोमवारी ४, तर मंगळवारी १ असे दोन दिवसांत पाच नवीन रुग्ण आढळले. यामुळे तालुक्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ९ झाली. जिल्ह्यात ती सर्वाधिक आहे. मात्र, सक्रिय रुग्णांपैकी सर्वांना सौम्य लक्षणे असल्याने एकही उपचार्थ दवाखान्यात दाखल नाही.

भुसावळात सव्वा दोन महिन्यानंतर कोरोनाने डोके वर काढले आहे. विशेषत: गेल्या आठवड्यापासून वाढ होत आहे. शहरात तीन दिवसांपूर्वी चार सक्रिय रुग्ण होते. यानंतर सोमवारी चार, तर मंगळवारी एका नवीन बाधिताची भर पडली. दोन दिवसांत पाच रुग्ण वाढल्याने एकूण सक्रिय बाधितांची संख्या ९ झाल्याने आरोग्य विभागाने चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.