आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य आणि मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्या. जेणेकरून परीक्षेच्या सरावासोबत अभ्यासात मदत होईल, असा सल्ला मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव डाॅ.सी.एस.चौधरी यांनी दिला. मुक्ताईनर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, तर खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील, जे.ई.स्कूलचे उपप्राचार्य जे.जे.पाटील प्रमुख पाहुणे होते.
उपस्थिती ३०० विद्यार्थ्यांपैकी आकांक्षा प्रधान, रेवती ठाकूर, चेतन लोखंडे, रितेश तायडे, ऋषिकेश पाटील, दर्शना बडोगे यांनी अनुभव कथन केले. नंतर डॉ.सी.एस.चौधरी शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये आपल्या जीवनात का आवश्यक आहेत? हे पटवून दिले. उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील यांनी, परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. शिक्षणामुळे आयुष्याला दिशा मिळते असे सांगितले. जे.जे.पाटील यांनीही संवाद साधला. सूत्रसंचालन प्रा.व्ही.बी.राणे, आभार प्रा.एन.पी.महाजन यांनी मानले. प्रा.कपिल जंगले, डी.बी. वारुडे, अमोल पाटील, भूषण चौधरी, चंदू पाटील यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.