आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहस, प्रयत्न व कष्ट करण्याची तयारी असली की त्यांच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. त्यामुळे स्वतःला परिपूर्ण करण्यावर युवकांनी भर दिला पाहिजे, असे आवाहन उद्योजक आर.एस. पाटील यांनी केले. तालुक्यातील मोरगाव येथे जे.के. पाटील वेल्फेअर सोसायटीतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय व्याख्यानमालेत ‘यशस्वी उद्योग उभारणी’ या विषयावर विचार पुष्प गुंफताना ते बोलत होते.
आरंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जे.आर. पाटील होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे कर्नल उत्तमराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, संतोष पाटील, प्रल्हाद पाटील, डॉ.राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित हाेते.
संस्थेतर्फे लोकहिताची कामे करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, अटवाड्याचे सरपंच गणेश महाजन, नेहेत्याचे सरपंच महेंद्र पाटील, मोरगाव बुद्रूकचे सरपंच स्वप्निल पाटील, विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक एस.डी. पाटील यांनी केले तर आभार व्ही.व्ही. पाटील यांनी मानले. युवकांमध्ये समाधान व्यक्त झाले.
अग्निवीर भरतीमुळे युवकांना राेजगारासह देशसेवेची संधी
केंद्र सरकारने अग्नी वीर भरतीद्वारे सैन्यात दाखल होणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. देशाचे सैन्यदल तरूण करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येकाने देशसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण होते तेवढेच ते टिकवणे कठीण आहे. यासाठी प्रत्येकाने देशसेवेची जाणीव ठेवावी, असे आवाहन कर्नल उत्तमराव पाटील यांनी केले. तर ‘अग्नीवीर भरती’ या विषयावर कर्नल उत्तमराव पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.