आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:खासगीकरण धोरणांविरुद्ध कर्मचारी आक्रमक

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, एकतर्फी धोरणात्मक बदल आणि होऊ घातलेले कंपन्यांचे विभाजन व खासगीकरणाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आक्रमक झाला. पदाधिकाऱ्यांनी दीपनगरातील गणपती मंदिराजवळ द्वारसभा घेतली. त्यात खासगीकरण व कामगार हितविरोधी धोरणांना विरोधाची भूमिका घेतली.

उर्जा विभागाने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांमध्ये होऊ घातलेले खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, महानिर्मीती कंपनीमार्फत सद्यःस्थितीत चालवण्यात येणारी सर्व जलविद्युत केंद्रे महानिर्मितीकडे मालकी हक्काने हस्तांतरित करावी, महानिर्मिती कंपनीचे सौरऊर्जा प्रकल्प कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत चालवावे, एमओडीच्या स्पर्धेत वीज स्वस्त कशी होईल? यासाठी प्रयत्न करावे, नाशिक (एकलहरे) येथे नवीन संच उभारणी करावी, नवीन आऊटसोर्स कॉन्ट्रक्ट कमी करून नियमित कर्मचाऱ्यांमार्फतच काम करावे, पदवी-पदवीधारक कर्मचाऱ्यांना अंतर्गत अधिसूचनेद्वारे पदोन्नती, महा-निर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन, मुख्य कार्यालय पातळीवरील सर्व पदाचे प्रमोशन पॅनल निकाली काढावे आदी मागण्यांसाठी द्वारसभा झाली. केंद्रीय समिती सदस्य सुरेशचंद्र सोनार, केंद्रीय सह संघटनमंत्री संजय आमोदकर, सचिव अनंत जाधव, महिला प्रतिनिधी सुनीता नाईक, झोन अध्यक्ष योगेश ढाके, सचिव संजय तायडे, सर्कल अध्यक्ष बादल तायडे, सचिव इंद्रजीत राऊत, सचिन भावसार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...