आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक ; आज दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुध निर्माणी भुसावळच्या संरक्षण कामगारांनी विरोध सप्ताह आंदोलन पुकारले आहे. त्यात बुधवारी (दि.२) तिसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. मुख्य द्वारावर सकाळी सर्व कामगार एकत्र आले. तेथे संयुक्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून काळ्या फिती लावून आपापल्या कामावर गेले. या आंदोलनात कर्मचारी गुरुवारी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून उपवास करणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन सुरु केले आहे. भुसावळ आयुध निर्माणीतील कर्मचारी त्यात सहभागी आहे. बुधवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. यापुढील टप्प्यात गुरुवारी कर्मचारी दुपारच्या जेवणावर बहिष्कार (उपवास) टाकणार आहेत. शुक्रवारी (दि. ४) महाप्रबंधकांमार्फत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. भुसावळ आयुध निर्माणीत संयुक्त संघर्ष समितीचे दिनेश राजगिरे, किशोर सूर्यवंशी, आशिष मोरे, नीलेश देशमुख, किशोर पाटील, अनिल भिरुड, नितेश तायडे, किशोर रिल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...