आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:यावल तालुक्यातील कोरपावली, वड्री व सांगवी येथे झाली पदाधिकाऱ्यांची उत्साहात निवड; विकासो चेअरमन, व्हाइस चेअरमन अविरोध

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोरपावली, वड्री व सांगवी येथील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यासाठी संचालक मंडळांनी पुढाकार घेतला. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटी सचिव, अन्य कर्मचाऱ्यांनी निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

कोरपावली : चेअरमनपदी फेगडे; व्हा.चेअरमनपदी नेहेते

यावल कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड मंगळवारी पार पडली. चेअरमनपदी भाजप पुरस्कृत पॅनलचे राकेश फेगडे यांची पुन्हा तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री नेहेते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरपावली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने नुकतीच पार पडली. त्यात भाजप पुरस्कृत पॅनलने बहुमत मिळवले. चेअरमन म्हणून पुन्हा राकेश वसंत फेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री वासुदेव नेहेते यांचीही बिनविरोध निवड झाली. या निवड प्रसंगी वि.का. सोसायटीचे संचालक ललित महाजन, सुधाकर नेहेते, यशवंत फेगडे, वसंत महाजन, दत्तात्रय महाजन, इम्रान पटेल, शरद पाटील, सुलोचना जावळे, महेंद्र नेहते आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक कार्यालयाचे एम.पी. भारंबे यांनी काम पाहिले तर प्रक्रियेकरिता सचिव मुकुंदा तायडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सांगवी खुर्द : चेअरमनपदी भास्कर पाटील, व्हा.चेअरमन रवींद्र पाटील

यावल सांगवी खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात विकासोच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक पार पडली. चेअरमन म्हणून भास्कर गिरधर पाटील यांची तर व्हा.चेअरमन म्हणून रवींद्र संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक अधिकारी दस्तगीर तडवी यांनी काम पाहिले.

या निवड प्रसंगी सोसायटीचे सचिव सुरेश नारायण मानेकर, संचालक लोटू रतन धनगर, सदाशिव डिगंबर कोळी, आनंदा रामदास धनगर, राजेंद्र पाटील, उत्तम शामू अडकमोल, जिजाबाई विलास पाटील, विमलबाई भागवत पाटील, लीलाधर देविदास पाटील, दत्तू काळू पाटील, विकास गणेश पाटील, मुकुंदा काळू कोळी यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत कैलास धनगर, हिरामण पाटील, आकाश धनगर, संजय धनगर, भगवान पाटील, सुधाकर कोळी, प्रवीण सोनवणे, डिगंबर कोळी, मयुर कोळी, रघुनाथ धनगर यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...