आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर येथील कार्यक्रमात दर्शना पवार यांचे प्रतिपादन‎:स्त्री-पुरुष समानता म्हणजेच‎ एकमेकांचा सन्मान करणे होय‎

अमळनेर‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्री -पुरुष समानता म्हणजे स्री-पुरुषांची‎ तुलना किंवा भांडण नाही, तर दोघांनी‎ एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांचे‎ श्रमाचे मूल्य स्वीकारणे हाेय. नैसर्गिक‎ लिंग, लिंगाकडून केलेल्या अपेक्षा म्हणजे‎ जेंडर सामाजिक लिंग हे समजावून सांगत‎ मुळात समानतेवर बोलणे म्हणजे‎ स्त्रियांच्या बाजूने बोलणे नाही, तर‎ न्यायाच्या बाजूने बोलणे हाेय, असे‎ प्रतिपादन दर्शना पवार यांनी केले.‎ सम्यक व महिला आर्थिक विकास‎ महामंडळाच्या वतीने पुरूष मास्टर ट्रेनर‎ यांची स्री-पुरुष समानता विषयावर धुळे‎ येथील गणपती पॅलेसमध्ये तीन दिवसीय‎ कार्यशाळा पार पडली. त्यावेळी विषयतज्ज्ञ‎ म्हणून अमळनेर येथील दर्शना पवार बाेलत‎ होत्या.

या कार्यक्रमात साक्री, शिरपूर,‎ शिंदखेडा, धुळे येथील पुरुष ट्रेनर सहभागी‎ झाले हाेते. या वेळी गाणी, खेळ, गटचर्चा‎ अशा वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.‎ कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांवर‎ होणारी हिंसा कमी करणे व महिलांना‎ सन्मानाने उभे राहण्यासाठी मदत करणे, हे‎ माविम मित्र मंडळाचे ध्येय असेल, असे या‎ वेळी समजावून सांगण्यात आले. माविम‎ मित्र मंडळाचे विजय सोनवणे, प्रशांत मोरे,‎ संदीप मराठे उपस्थित होते. कार्यशाळेस‎ माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संदीप‎ मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य‎ केले. दिनेश पाटील व गोरख पाटील‎ आदींसह प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त‎ केले. धुळे येथील गणपती पॅलेसमध्ये‎ आयाेजित कार्यशाळेत माेठ्या संख्येने‎ प्रशिक्षणार्थींची उपस्थिती हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...