आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण:जलवाहिनीला गळतीमुळे दररोज होते पाण्याची नासाडी ; दुरुस्तीसाठी वार्षिक कंत्राट देऊनही समस्या जैसे थे

भुसावळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नाहाटा महाविद्यालय जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला जामनेर रोडवरील नाल्या जवळ गळती लागली आहे. यासोबतच जामनेर रोडवर किमान तीन ठिकाणी लहानमोठ्या गळत्यांमधून दररोज पाण्याची नासाडी होते. पालिकेने जलवाहिनी दुरुस्तीसाठी वार्षिक कंत्राट दिलेले असूनही गळत्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते.

हिवाळ्याला सुरूवात होताच जीर्ण जलवाहिन्या वारंवार लिकेज होत असल्याने कमी दाबाने पुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रातून नाहाटा महाविद्यालय जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जामनेर रोडवरील बलबलकाशी नाल्यावर गळती लागली आहे. यासोबतच जामनेर रोडवरील हॉटेेल रंगोली परिसर, एसबीआय बँकेजवळील गटारीजवळ व अन्य दोन ठिकाणी गळती लागली आहे. तेथून दररोज पाण्याची नासाडी होते. पालिकेने गळती जोडणीचे वार्षिक कंत्राट दिलेल्या ठेकेदाराकडून हे काम तातडीने करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष केले जाते.

बातम्या आणखी आहेत...