आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हर घर दस्तक अभियान; 147 जणांचे लसीकरण ; व्हेरियंट आल्यास रुग्णसंख्या वाढू शकते

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारपासून शहरात ‘हर घर दस्तक’ अभियान सुरु केले आहे. त्यात १६ पथकांनी विविध भागांमध्ये घरोघरी जावून बुधवारी पहिल्या दिवशी १४७ जणांचे लसीकरण केले. यात २२ जणांनी पहिला, ७१ दुसरा, तर ५४ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने ४८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले १६ पथके तयार केले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये बुधवारपासून या पथकांनी घरोघरी जावून लसीकरण सुरु केले. डायमंड पार्क खडका रोड, जाम मोहल्ला, नालंदा नगर, प्रल्हाद नगर, नीलकंठेश्वर नगर, कोळीवाडा, भारत नगर, वाल्मीक नगर, गंगाराम प्लॉट आदी भागात या पथकांनी बुधवारी पहिल्या दिवशी १४७ जणांचे लसीकरण केले.

संसर्गापासून बचाव होईल ^कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्यास रुग्णसंख्या वाढू शकते. अशावेळी शहराची इम्युनिटी वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. यामुळे पहिला, दुसरा व बूस्टर असे तिन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. पथक घरोघरी जावून लसीकरण करत आहेत. डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...