आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहाळ येथील माध्यमिक विद्यालयातील सन १९९९-२००० या वर्षीच्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २२ वर्षांनंतर दुपारी १२ वाजता रविवारी ऋषिपांथा येथे आयाेजित स्नेह मेळाव्यात एकत्र आले. त्यात या विद्यार्थ्यांनी जुन्या संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. इतक्या वर्षानंतर भेटल्याचा आनंद व्यक्त करून त्यांनी आपापला परिचय करून दिला.
अनेकांनी शाळेत असताना केलेल्या खोट्याची आठवण करून दिली .आपल्येला शिकवत असलेल्या गुरुजनांच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम. पाटील होते. तर व्ही.आर. पाटील, पी.एस. करनकाळ, जी.डी. चव्हाण, ए.ओ. पाटील, सी.सी. माळतकार, एस.बी. चव्हाण, पी.आर. सोनवणे, वाय.आर. सोनावणे, आशा देशमुख आदी शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सविता पाटील रंजना मोरे, सारिका जाधव, वंदना महाजन, शोभा परदेशी, सुवर्णा चौधरी आदी विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यास उपस्थित होत्या.
शिक्षकांनी मनोगतात, आई-वडिलांची सेवा करा, व गुरुजनांचा मान ठेवा असे आवाहन केले. सुुजाण विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी श्रीमंती असते, असे सांगून शाळेतील आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक देवरे यांनी केले तर आभार सचिन पगारे यांनी मानले. कार्यक्रमास सचिन बागुल, दीपक भोई, दयाराम पगारे, सचिन पगारे, अतुल महाजन, अंकुश वाघ, दीपक ढोले, भैय्या महाले, अखिल शहा, पांडुरंग सोनवणे, विजय पाटील, केशव महाजन, यादव कोळी, प्रदीप परदेशी, सतीश चौधरी, योगेश महाजन आदींनी परिश्रम घेतले. बाहेर गावाहून आलेल्या सर्व मित्रांचे आभार व्यक्त करून स्नेह भोजनाने तसेच पुन्हा भेटण्याचा संकल्प व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
स्नेह मेळाव्यास उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी. व्यापारी, नाेकरदार, पाेलिस यांची उपस्थिती या स्नेह मेळाव्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, शिर्डी, श्रीरामपूर, धुळे व बहाळ येथे नोकरी-व्यवसायानिमित् त गेलेल्या, स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली. त्यात व्यापारी, नाेकरदार, पाेलिस, विविध व्यावसायिक बनलेल्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.