आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:विना परवाना वाळू उत्खनन केले; दोघांना 1 वर्ष कारावासाची शिक्षा

भडगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येकी एक हजार दंड भरावा लागणार, भडगाव न्यायालयाचा निकाल

येथील मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात चाललेल्या एका गौण खनिज वाळू उत्खननाच्या खटल्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने दोन्ही आरोपींना प्रत्येकी एका वर्षाचा कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

२८ जून २०११ रोजी ९ वाजता गिरड ते अंजनविहिरे रस्त्यावर आरोपी नाना भास्कर पाटील व सुभाष धनराज पाटील, दोघे रा.गिरड, ता.भडगाव यांनी संगनमताने गिरणा नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन करुन त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये विनापास परमिट लबाडीच्या इराद्याने चोरून घेवून जात असताना आढळून आले. त्यामुळे सुरेश तुकाराम महाले, तहसील कार्यालय यांनी या दोघांच्या विरुध्द भडगाव फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पो.हे.कॉ. हिरालाल सुपडू पाटील यांनी करुन दोघा आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदारांचा साक्षी पुरावा नोंदवण्यात आला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून व्ही.डी. मोतीवाले यांनी भक्कमपणे सरकार पक्षाची बाजू मांडून युक्तिवाद केल्याने दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. ६ मे रोजी मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. खराटे यांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ सह ३४ अन्वये दोन्ही आरोपींना प्रत्येकी एका वर्षाचा साधा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...