आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा‎ विसर्जनाची मिरवणूक:चिनावल येथे विसर्जन‎ मिरवणुकीचा उत्साह‎

चिनावल‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रीच्या नऊ दिवसांत सर्वत्र‎ जल्लोष पहायला मिळाला.‎ सर्वत्र त्यामुळे उत्साहाचे व‎ चैतन्याचे वातावरण होते. २६‎ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या‎ शारदीय नवरात्रीच्या पहिल्या‎ दिवसापासून ते विसर्जनाच्या‎ दिवसापर्यंत येथे हा उत्सव‎ अतिशय शांततेत व उत्साहात‎ पार पडला. गुरुवारी दुपारी १२‎ वाजेपासून मंडळांच्या दुर्गा‎ विसर्जनाची मिरवणूक प्रमुख‎ मार्गावरून सुरू झाली.‎ ढोल-ताशे व बँजोच्या तालावर‎ मंडळाचे कार्यकर्ते नृत्य करत‎ हाेते.‎

यावर्षी रात्री १० वाजेपर्यंत‎ मिरवणुकीला परवानगी होती.‎ कोरोनानंतर प्रथमच विसर्जन‎ मिरवणुकीला परवानगी‎ मिळाल्याने पोलिसांच्या‎ बंदोबस्तात अतिशय उत्साहात‎ मिरवणूक पार पडली. रात्री १०‎ वाजता पोलिसांच्या सूचनेनुसार‎ सर्व मंडळांतर्फे वाद्ये बंद‎ करण्यात आली.

मिरवणूक‎ अत्यंत शांततेत पार पडली.‎ यावेळी सावदा पोलिस ठाण्याचे‎ सपाेनि समाधान गायकवाड‎ यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त‎ राखण्यात आला. दरम्यान वेळेत‎ विसर्जन मिरवणूक शांततेत व‎ उत्साहात पार पडल्याने समाधान‎ व्यक्त झाले.‎

बातम्या आणखी आहेत...