आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यपदार्थांचा पंचनामा:रेल्वे स्थानकावर मुदत‎ संपलेल्या खाद्यपदार्थांची‎ विक्री केल्याचे उघड‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ रेल्वे स्थानकावरील‎ प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर रेल्वे‎ सल्लागार समिती सदस्य अनिरुद्ध‎ कुलकर्णी यांनी एक चिवड्याचे‎ पॅकेट घेतले. मात्र, बारकाईने‎ निरीक्षण केल्यावर त्याची मुदत‎ संपल्याचे समोर आले. यामुळे‎ त्यांनी मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या‎ विक्रीप्रकरणी वरिष्ठ वाणिज्य‎ प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे‎ यांच्याकडे तक्रार केली. यानंतर‎ स्टॉलची चौकशी व पंचनामा‎ करण्यात आला.‎ कुलकर्णी यांनी प्लॅटफॉर्म ४‎ वरील एका स्टॉलवरून एका‎ नामांकित कंपनीच्या खाद्यपदार्थाच्या‎ पॅकिंग पुड्या घेतल्या. पण,‎ त्यावरील मुदत संपल्याचे त्यांच्या‎ लक्षात आले. त्यांनी ही बाब वरिष्ठ‎ वाणिज्य प्रबंधक डॉ.मानसपुरे यांना‎ कळवली. यानंतर वाणिज्य‎ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुलकर्णी‎ यांच्या उपस्थितीत मुदत संपलेल्या‎ खाद्यपदार्थांचा पंचनामा करून ते‎ ताब्यात घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...