आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळमर्यादा वाढवून द्यावी:गणेशोत्सवात वेळमर्यादा रात्री १२वाजेपर्यंत वाढवा; सार्वजनिक मंडळांची बैठकीत एकमुखी मागणी

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्ण गणेशोत्सव काळात रात्री १२ पर्यंत वेळमर्यादा वाढवून द्यावी, शहरातील मिरवणूक मार्गावर पालिकेने जनरेटरवर चालणारे हॅलोजन दिवे लावावे, वीज कंपनीकडून मंडळांना परवानगी देताना होणारी फिरवाफिरव थांबवावी, उत्सव काळात रात्रीच्या वेळी सुरळीत वीजपुरवठा आणि गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशा अपेक्षा मंडळांनी बुधवारी पोलिसांनी आयोजित बैठकीत व्यक्त केल्या.

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे बुधवारी शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.डीजेला परवानगी नाही प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने नियमानुसार पोलिसांची परवानगी घ्यावी. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असला तरी विसर्जन मिरवणुकीत कुणालाही डीजेला परवानगी मिळणार नाही. सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी

गणेशाेत्सवापूर्वी खड्डे बुजवणार
गणेशाेत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या मार्गावर वाहने, पादचाऱ्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने मंडप टाकावे. विसर्जनावेळी नदीकाठावर बॅरिकेडिंग करण्यात येईल.
संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी

बातम्या आणखी आहेत...