आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपासून झालेली प्रवाशांची गर्दी अजूनही कायम असल्याने कानपूर-एलटीटी-कानपूर आणि विरांगणा लक्ष्मीबाई एक्स्प्रेस-पुणे विशेष गाडीच्या कालावधीत वाढ केली आहे. ही गाडी भुसावळ विभागातून धावत असल्याने प्रवाशांना त्याचा लाभ होईल.

०४१५१ या विशेष गाडीचा कालावधी संपत हाेता. ही गाडी आता २ डिसेंबर ते ३१ मार्च २०२३ पर्यंत चालेल. एकुण १८ फेऱ्या वाढल्या आहेत. ही गाडी दर शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता कानपूरहून सुटेल. शनिवारी दुपारी २.५५ वाजता एलटीटीला पाेहोचेल.

परतीच्या प्रवासात ०४१५२ क्रमांकाची गाडी ३ डिसेंबर ते १ एप्रिल २०२३ पर्यंत चालवली जाईल. या गाडीच्या १८ फेऱ्या होतील. ही गाडी दर शनिवारी सायंकाळी ५.१५ला एलटीटीवरून सुटून रविवारी दुपारी ३.२५ला कानपूरला पाेहोचेल. विरांगणा लक्ष्मीबाई एक्स्प्रेस-पुणे गाडीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...