आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा इशारा:बांधकाम परवाने मिळेना; अधिकाऱ्याला नोटीस

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पालिकेच्या नगररचना विभागातून बांधकामांचे परवाने विलंबाने मिळत आहेत. या प्रकरणी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी जळगाव येथील सहाय्यक संचालक, नगररचना विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने चोपडा नगरपालिकेचे व शहराची अतिरिक्त जबाबदारी असलेले सहाय्यक नगर रचनाकार शुभम उगले यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देणारी नोटीस नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रा.म.पाटील यांनी बजावली आहे.

शुभम उगले पालिकेत येत नसल्याने सहा ते सात महिन्यांपासून दाखल केलेल्या इमारत बांधकाम प्रकरणांना परवानगी मिळालेली नाही. अशा प्रकरणांची संख्या ८०पर्यंत आहे. याबाबत शहरातील १५ परवानाधारक अभियंत्यांनी जळगावात सहायक संचालकांची (नगर रचना) भेट घेऊन तक्रार केली. तेथे बांधकाम परवानगीचे प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब लागत असल्याचे सांगितले.

दोन दिवस उपस्थितीचे निर्देश
भुसावळ पालिकेत अतिरिक्त कार्यभार सोपवल्याने उगले यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच कामाचा निपटारा जलद गतीने करणे आवश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम, १९८१ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...