आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पोलिसांकडून जुगाराचा खोटा गुन्हा दाखल; न्यायालयात दाद मागणार

मुक्ताईनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिसांत मुंबई जुगार कायद्यांतर्गत दाखल केलेला गुन्हा खोटा गुन्हा असून या गुन्ह्याच्या विरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार असून आपल्याकडे निर्दोष असल्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती जितेंद्र पाटील, अनिल कोळी, रवींद्र खिरोडकर, संजय मराठे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

मुक्ताईनगर पोलिसांत ७ जून रोजी मुंबई जुगार कायद्यांतर्गत झन्ना मन्ना जुगाराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात आम्ही हा खेळ खेळतच नव्हतो व त्या संदर्भात आपल्याकडे पुरावे असून आम्ही निर्दोष आहोत. गुन्हा रद्द व्हावा यासाठी लागणारे सर्व पुरावे न्यायालयात सादर करू.

बातम्या आणखी आहेत...