आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबळीराजा आता फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येत आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आधी श्रमदानातून शेत-शिवारात पाणी जिरवले. तर आता शेतशिवार फुलवायचंय म्हणून पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने कंबर कसून कामाला लागला आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून अमळनेर तालुक्यातील १५ गावांमधील २८ गटातील ६७५ शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी होत १ हजार १३२ हेक्टर क्षेत्राची स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यासाठी तालुक्यातील शेतकरी गट कामाला लागले असून प्रशिक्षण घेतलेल्या डांगर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी जय योगेश्वर गटाच्या माध्यमातून कापूस बियाण्याच्या ४९२ बॅग जिल्ह्यातील मुख्य वितरकांकडून महाराष्ट्र शासनाच्या ‘एक पीक, एक वाण’ या योजनेसाठी खरेदी केल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे ४७ हजार रुपये वाचले आहेत.मुख्य वितरकाने ८१० रुपये किंमत असलेली १ बॅगेची ७३० रुपयाप्रमाणे आकारणी केली. ९२ बॅगेत प्रति बॅग ८० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांचे ७ हजार ३६० रुपये वाचले आहे. या बचतीचे गणित लक्षात घेऊन गटातील व गावातील उर्वरित शेतकऱ्यांना योजनेचे महत्त्व लक्षात आले आहे.
असे मिळेल बक्षीस
तालुका पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकरी गटास १ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या गटास २५ लाख, द्वितीय पारितोषिक १५ लाख तर तृतीय पारितोषिक १० लाखांचे असेल. यात वॉटर कप स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाची राज्य पातळीवर निवड झाली होती. त्यामुळे फार्मर कप स्पर्धेतही तालुक्यातील गट राज्यपातळीवर पोहोचेल.
असे राहील मूल्यांकन : संस्था म्हणून गटांचे काम ८० गुण, ज्ञान ३० गुण, उत्पादन प्रक्रिया ३० गुण, शाश्वत शेती ३० गुण, शेतीची गुणवत्ता जपून उत्पादन व विक्री ३० गुण. या प्रकारे मूल्यांकन करुन फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गटाची निवड करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.