आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शेतकऱ्यांनो आर्थिक प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय करा ; महाजन

न्हावी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्हावी (ता.यावल) येथील दूध उत्पादक संस्थेची ६२ वी वार्षिक सभा खंडेराव मंदिर हॉलमध्ये चेअरमन नितीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात सभासदांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय करावा, असे आवाहन टीए ई सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांनी केले.

संस्थेचे चालू वर्षी ७४ लाख ८ हजार ७०० रुपये भागभांडवल आहे. ५१८ पुरुष व ५९ महिला असे एकूण ५७७ सभासद आहे. चालू वर्षात संस्थेला ३ लाख ३५ हजार ४४० रुपये निव्वळ नफा झाला. प्रति शेअर १० टक्के व सभासद दूध बोनस ६० टक्के सभासदांना खात्यामध्ये वर्ग करण्यात आला. सभेपुढे चेअरमन चौधरींनी टाळेबंद, जादा झालेला खर्च, नफा वाटणी, अंदाजपत्रक सादर केले. सर्वाधिक दूध पुरवठादारांचा सत्कार झाला. सभासदांच्या दहावी, बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला. व्हाइस चेअरमन पराग वाघुळदे, सेक्रेटरी पंकज फेंगडे यांनी वाचन केले. प्रवीण वारके यांनी आभार मानले. दरम्यान, मागील वर्षी प्रमाणे सभासदांना तुपाची बरणी द्यावी व फॅट कमी असलेले दूधही घेऊन ते वेगळ्या भावाने विक्री करावी, अशी सूचना व्ही.बी.वारके यांनी मांडली. तर मागील वर्षापेक्षा २ लाख लिटर दूध पुरवठा कमी झाल्यामुळे व संस्थेमध्ये दूध पुरवठादारांची संख्या वाढावी म्हणून तपाची बरणी न देता जे दूध उत्पादक आहेत त्यांना प्रोत्साहनपर प्रति लिटर ५० पैसे प्रमाणे वर्षभरातील दुधावर बक्षीस दिल्याचे संस्थेने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...