आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सूनची उत्तरेतील वाटचाल मराठवाडा, खान्देशातून पुढे मध्य प्रदेशकडे सरकत असताना कुठेही अपेक्षित पाऊस होत नाही. मान्सूनच्या काेरड्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती आहे. पावसाने पाठ फिरवली असताना तापमानही ३९.८ अंशापर्यंत कायम आहे.
अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या मान्सूनचे ११ जून रोजी मुंबई तर १३ जून रोजी गुजरातमार्गे खान्देशात आगमन झाले आहे. पुढे वाटचाल करत असताना अपेक्षित पाऊस कुठेही झालेला नाही. तुरळक ठिकाणी झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या स्थितीवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी, कपाशी लागवड सुरू केली. मात्र, किमान १०० मिमी पाऊस किंवा जमिनीत चांगली ओल तयार झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
तापमान कायम, पावसासाठी तीन दिवस प्रतीक्षा
जिल्ह्यात तापमान अजूनही चाळिशीच्या आसपास आहे. बुधवारी ३९.८ अंश होते. ढगाळ वातावरणातही तापमान आणि उकाडा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चांगल्या पावसासाठी जळगावकरांना आणखी तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.