आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम समृद्ध दिवस साजरा:शेतकऱ्यांनी रोहयोच्या योजनांद्वारे लखपती व्हावे ; बीडीओ चौधरी, चुंचाळेत एक दिवस मजुरांसोबत

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चुंचाळे येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’ या उपक्रमातून ग्राम समृद्ध दिवस साजरा करण्यात आला. मजुरांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. गावात मनरेगाच्या माध्यमातून केलेल्या कामांची पाहणी गटविकास अधिकाऱ्यांनी केली. रोहयोच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील लखपती व्हावा, अशी अपेक्षा बीडीओंनी व्यक्त केली.

चुंचाळे येथे यावलचे बीडीओ एकनाथ चौधरी, रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विशाल राऊत यांच्या उपस्थितीत एक दिवस मजुरांसोबत उपक्रमातून ग्राम समृद्ध दिवस साजरा झाला. त्यात ग्रामरोजगारांना शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली. बीडीओ चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राऊत, संगणक परिचालक किशोर कोळी, ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर, सरपंच सुनंदा संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रहिमान तडवी, संजय तडवी, ग्रामरोजगार सेवक दीपक कोळी, संगणक परिचालक सुधाकर कोळी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक समाधान धनगर व रोहयो मजूर उपस्थित होते. बीडीओ चौधरींनी चुंचाळे गाव परिसर व रस्त्याच्या दुतर्फा केलेली वृक्ष लागवड, संगोपनाबद्दल समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...