आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदशील पद्धतीने आंदोलन:खडकारोडच्या चौकशीसाठी उपोषण

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खडका रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करून रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या व इतर मागण्यांसाठी आम आदमी पार्टीतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. त्यास खडका रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.

खडका रोडवरील उर्दू शाळेची इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना धोका आहे. मिल्लत नगरमध्ये नाल्याची पडदी व संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे अशा मागण्या देखील पक्षाने केल्या. उपोषणात आम आदमी पार्टीचे प्रदेश सहसचिव दिलीप सुरवाडे, भुसावळ तालुका संयोजक प्रमोद पाटील, रावेरचे युवराज महाजन, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष ईशारद खान सहभागी झाले. नंतर पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी युवा शहर प्रमुख करण लखन, युवा सचिव जितेश कछवे, सलमान तडवी, अनिल टाक उपस्थित होते.

सनदशीर मार्गाने आमचा लढा सुरूच ठेवणार
आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लोकशाही मार्गाने व सनदशील पद्धतीने आंदोलन करू. पालिकेने खडका रोडच्या निकृष्ट कामाची चौकशी व पुन्हा दुरुस्ती करावी. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होतो. त्यातून त्यांची सुटका व्हावी. दिलीप सुरवाडे, प्रदेश सहसचिव, आम आदमी पार्टी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...