आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची व्यथा:दहा महिने वेतन नसल्यामुळे उपोषण

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर केंद्र ते वेल्हाळे अॅश पॉडच्या‎ पाइपलाइनच्या निरीक्षणासाठी‎ ठेकेदारीत नियुक्त १२ कामगारांना,‎ गेल्या दहा महिन्यांपासून पगार नाही. या‎ प्रकरणी १२ कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह‎ बुधवारपासून लाक्षणिक उपोषण केले.‎ दीपनगर औष्णिक केंद्रातून विल्हाळे‎ येथील बंडामध्ये राख वाहून नेण्यासाठी‎ दीपनगर ते वेल्हाळे अशी १३ किमीची‎ पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे.‎ या पाइपलानच्या निरीक्षणासाठी‎ गुजरात येथील कंपनीला काम देण्यात‎ आलेले आहे.

या कंपनीने एप्रिल २०२२‎ पासून १२ कर्मचारी नियुक्त केले. मात्र‎ दहा महिने होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन‎ दिले नाही. १ मार्चला या कंपनीच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ निविदेची मुदत संपते. तरी कामगारांना‎ पगार मिळालेला नाही. यामुळे संतप्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कामगारांनी आपल्या कुटुबियांसह‎ बुधवारी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.‎

रखडलेल्या वेतनासाठी ठेकेदाराला अल्टिमेटम
‎कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नीदीपनगर औष्णिक केंद्राने संबंधीत ठेकेदाराला‎ अल्टीमेटम दिला आहे. कामगारांचा वेतन दहा दिवसांत अदा करावे,अन्यथा‎ नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आली आहे. वेतन मिळे‎ पर्यंत उपोषण सुरु राहिल, अशी माहिती लोकसंघर्षचे चंद्रकांत चौधरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...