आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष चिन्ह:नगरपालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढा ; भाजपच्या बैठकीमध्ये उमटला सूर

फैजपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक सावदा रोडवरील लक्ष्मी सॉ मिलमध्ये पार पडली. त्यात आगामी निवडणूक पक्ष चिन्हावर लढवण्याचा मनोदय व्यक्त करून प्रभाग रचनेचा आढावा घेतला.

अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी होते. त्यांनी केंद्र सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवणे, बूथ समिती अध्यक्ष, सदस्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. यावेळी ओबीसी प्रदेश सचिव भरत महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, विलास चौधरी, नरेंद्र नारखेडे, बी.के.काका यांनी संवाद साधला. प्रास्ताविक संजय सराफांनी केले. यावेळी अनंता नेहेते, उमेश फेगडे, नीलेश राणे, पांडुरंग सराफ उपस्थित होते.