आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी  नुपूर शर्माविरुध्द गुन्हा दाखल करा

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका न्यूज चॅनलवर चर्चा करताना इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर यांच्या नावाने अपशब्द वापरून मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तालुका व शहर एमआयएमच्या वतीने एका निवेदनाद्वारे ३१ मे रोजी तहसीदारांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनानुसार, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी २७ मे रोजी एका चॅनलवर चर्चा करताना इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर यांच्या नावाने अपशब्द वापरून संपूर्ण देशातील मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम समाज संतप्त झाला आहे. तरी मुस्लीमधर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एमआयएमचे आरिफ खान बिबन खान, शे. आसिफ शे. शरीफ, मोहसीन खान, शे. नईम, शे. कलीम, शे. आरीफ, शकील खान, शे. सलमान, रिजवान खान, मो. मलिक, इरफान शाह, अजहर शाह, शकील खान, शे. नाजीम आणी शे. सादिक यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...