आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून:अखेर दोन दिवस उशिराने खान्देशात मान्सूनची एंट्री

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस उशिराने मान्सून साेमवारी खान्देशात दाखल झाला. गुजरातच्या किनारपट्टीवरून खान्देशात दाखल झालेला मान्सून द्रोणीय स्थितीत मराठवाड्यातील परभणी, तिरूपती, पड्डूचेरीमार्गे बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.

गुजरातच्या दक्षिणेतून त्याची उत्तरेत वाटचाल सुरू आहे. दरम्यान, मान्सूनचा वेग वाढला असून मुंबईतून अवघ्या तिसऱ्याच दिवशी मान्सून खान्देशात दाखल झाला. हवामान विभागाने २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल हाेण्याचा अंदाज वर्तविला होता, त्याच वेळी खान्देशात ११ जुनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज होता.

गुजरातमार्गे आगमन
मागील वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात गुजरातच्या किनारपट्टीवरून मान्सून दाखल झाला. गुजरात, दक्षिण मध्यप्रदेशाचा काही भाग, नंदुरबार,धुळे आणि जळगाव मार्गे मान्सून मराठवाड्याकडे वळला. तो पड्डूचेरी, तिरूपती आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला.

तापमानात ५.२ अंश घट
यंदाच्या उन्हाळ्यात शहरात उच्चांकी तापमान होते. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर सोमवारच्या कमाल तापमानात ५.२ अंशांची घट झाली. सरासरी ४३ वर असलेला पारा ३८.८ अंशांपर्यंत घसरला. मात्र, सोमवारी सायंकाळी ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला.

बातम्या आणखी आहेत...