आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:अखेर तीन गळत्यांची दुरुस्ती; पूर्ण दाबाने होईल पाणीपुरवठा

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नाहाटा चौफुली जलकुंभावरून जोडणी असलेल्या जामनेर रोडवरील ४० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणाऱ्या मेन रायझिंगला ४५० मीटर अंतरात तीन ठिकाणी गळती लागली होती. पालिकेने बहुप्रतिक्षेने का होईना या गळत्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे वितरणादरम्यान अशुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. आता गळती दुरुस्तीनंतर हा प्रश्न सुटेल. नागरिकांना शुद्ध व पूर्ण दाबाने पाणी मिळेल.

भुसावळ शहरात बारमाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणारा तापी नदीतील बंधारा ओसंडून वाहत आहे, दुसरीकडे मात्र शहरात पाइपलाइनला गळत्या वाढल्या आहेत. नाहाटा चौफुली जलकुंभावरून जोडणी असलेल्या जामनेर रोडवरील मुख्य लाइनवरुन हॉटेल मल्हार समोरील भाग, सोनिच्छा वाडी शाळा परिसर आणि बडोदा बँकेसमोर गळती लागली होती. गळतीमुळे हजारो लिटर शुद्ध पाणी पाणी थेट गटारीत मिसळले जात होते. याबाबत ओरड वाढताच पालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...