आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्ड जळाले‎:पालिका जुन्या इमारतीला‎ आग, जीर्ण रेकॉर्ड जळाले‎

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ शहरातील पालिकेच्या जुन्या कार्यालयातील‎ तळमजल्याच्या दोन खोल्यांना आग लागली.‎ त्यात अकाऊंट विभागाचे जुने रेकॉर्ड‎ जळाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१०)‎ मध्यरात्री घडला. पालिकेच्या अग्निशमन‎ बंबाने अर्धा तासात आगीवर नियंत्रण‎ मिळवले. दरम्यान, १९८० पूर्वीचे कर्मचाऱ्यांचे‎ पेमेंट बिल, व्हाउचर असे रेकॉर्ड जळाल्याची‎ माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.‎ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील‎ पालिकेची ब्रिटिशकालीन इमारत आहे.‎ स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत जीर्ण‎ झाल्याचे समोर आले होते. यानंतर या‎ इमारतीतून प्रशासकीय कामकाज गोपाळ‎ नगरात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

तूर्त‎ जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील‎ उत्तरेकडील दोन खोल्यांमध्ये जुने रेकॉर्ड‎ होते. शुक्रवारी रात्री अचानक या दोन्ही रुमला‎ आग लागली. त्यात काही रेकॉर्ड जळाले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज‎ जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरु असल्याने गर्दी‎ होती. हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी‎ अग्निशमन विभागाला माहिती देवून बंब‎ बोलवला. अवघ्या अर्धा तासात आग‎ नियंत्रणात आली. पाण्यामुळे काही रेकॉर्ड‎ ओले झालेे. ते रेकॉर्ड अत्यंत महत्वाचे नाही.‎ सन १९८० पूर्वीच्या कर्मचाऱ्यांची वेतन बिले,‎ व्हाउचर आदी लेखा विभागाचे रेकार्ड होते,‎ अशी माहिती सूत्रांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...