आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण देण्यात आले:300  विद्यार्थ्यांना दिले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, महिला शक्ती सेवा समाज मंडळातर्फे एमआय तेली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ३०० विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले.

शाळेचे प्राचार्य वाजिद सय्यद, आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे, महिला शक्ती सेवा मंडळाच्या अध्यक्षा अंजुम खान, आईबाबा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.वंदना गवळी, अध्ययन पॅरामेडिकलच्या प्राचार्या मनीषा बाविस्कर, कल्पेश तायडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ यांची उपस्थिती होती. डॉ.वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वंदना गवळी यांनी, सीपीआरबद्दल माहिती दिली. नरवीरसिंग रावळ व दारासिंग इंगळे यांनी फायर अँड सेफ्टी व आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखवली. अवनी बहुउद्देशीय संस्थेचे दीपक नाटेकर, कल्पेश तायडे, धनराज सपकाळे, रोहित श्रीवास्तव या सर्प मित्रांनी विषारी व बिनविषारी सापांची माहिती, सर्पदंश झाल्यास काय करावे? हे सांगितले. सूत्रसंचालन अंजुम खान यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...