आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पकता:गतिरोधकांद्वारे वीजनिर्मितीचे उपकरण प्राथमिक गटात पहिले; चांगदेव येथे विज्ञान प्रदर्शन, एकूण ८० प्रयोगांची मांडणी

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर तालुक्याचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चांगदेव येथील एस.बी.चौधरी हायस्कूलमध्ये पार पडले. एकूण ८० उपकरणे तेथे ठेवली होती. अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत पाटील, तर खासदार रक्षा खडसे, बीडीओ अंकुश चौधरी, गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी हे प्रमुख पाहुणे होते. प्रदर्शनात नववी ते बारावी या माध्यमिक गटातून २९ उपकरणे, सहावी ते आठवी प्राथमिक गटात ४५ उपकरणे, माध्यमिक शिक्षक १, प्राथमिक शिक्षक ४, प्रयोगशाळा परिचर १ असे एकूण ८० उपकरणे होती.

असे आहेत विजेते
नववी ते बारावी माध्यमिक गट : अनुराधा वाघमारे (अॅन्टी स्लिप अलार्म फॉर ड्रायव्हर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर), खुशी पाटील (वॉटर लेवल इंडिकेटर, तराळ विद्यालय अंतुर्ली), आयुष भालेराव (ह्युमन बॉडी ऑर्गन्स पीपीटी, जे.ई.स्कूल मुक्ताईनगर), प्रतीक पाटील (वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, एस.एम.माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर), आर्यन हिरोडे (लेझर सेक्युरिटी डोअर, शिवाजी हायस्कूल कुऱ्हा), विनीत तळले (मॅग्नेटिक इलेक्ट्रिक जनरेटर).

शिक्षक गट : प्राथमिक शिक्षक गटातून जि.प.शाळा मालेगाव येथील उपेंद्र दहिवली, तर माध्यमिक शिक्षक गटातून एच.डी.चौधरी हायस्कूल चांगदेव येथील शिक्षक सुरेश पाडवी यांचा प्रथम क्रमांक आला. प्रयोगशाळा सहाय्यक या गटातून चांगदेवच्या मनीषा ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला क्रमांक आला, असे आयोजकांनी जाहीर केले.

सहावी ते आठवी प्राथमिक गट : अथर्व पाटील (जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ स्पीड ब्रेकर, एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव), राज काकडी (पर्यावरण अनुकूल सामग्री, अशोक फडके विद्यालय कुऱ्हा), प्रिन्स मांडवकर (ऑटोमिक स्ट्रीट लाईट, पूर्णामाई विद्यालय घोडसगाव), सुमेध कदम (हवेचा दाब उपयोग, जि.प.शाळा भोटा), पवन पारसकर (पवन ऊर्जा निर्मिती, जि.प.शाळा चिंचोल).

बातम्या आणखी आहेत...