आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:आधी दुरुस्ती, नंतर तारा तुटून वीजपुरवठा खंडित ; शहराच्या उत्तर भागातील ग्राहकांना मनस्ताप

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीने रविवारी शहरातील यावल, जळगाव रोडसह उत्तर भागात ट्री कटिंगची कामे केली. यामुळे उत्तर भागातील न्यायालय फीडर व परिसरात सकाळी, तर सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे तारा तुटून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. या खंडित वीजपुरवठ्याने ग्राहक त्रस्त असताना महावितरणने छाटणीनंतर रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या नाही. यामुळे अस्वच्छता वाढण्यासह रस्त्यावरून ये-जा करताना गैरसोय झाली.

महावितरणच्या मेंटेनन्सच्या कामासाठी रविवारी सकाळी तीन तास व सायंकाळी ६ ते ७.३० दरम्यान वीजपुरवठा खंडित होता. यानंतर पुन्हा अचानक वीजपुरवठा खंडित झाला. तो रात्री १२ वाजेच्या आसपास सुरळीत झाला.

बातम्या आणखी आहेत...