आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ उपविभागात शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात चार संशयितांसह तलवार घेऊन फिरणाऱ्यास पकडण्यात आले. ९ ठिकाणी दारू, तर ४ ठिकाणी जुगार अड्डे नष्ट करण्यात आले.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक विलास शेंडे यांनी सहकाऱ्यांसह कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात न्यायालयाने काढलेले चार अटक वारंट, ११ बेलेबल वॉरंट बजावण्यात आले. पोलिसांनी ३५ जणांना समन्स बजावणी केली. बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ ठिकाणी अवैध दारू व्यवसाय, तर ४ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. रात्री गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकूण ४ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तंबाखू व इतर तंबाखूजन्य प्रतिबंधक पदार्थ शालेय परिसरात विक्री करणाऱ्या ११ पानटपरी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. अवैध तलवार बाळगणाऱ्या एका जणांवर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. काेबिंग ऑपरशनमध्ये विना क्रमांकाने वाहने चालवणाऱ्या २१ जणांवर दंडात्मक, तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ६ जणांवर शहर वाहतूक शाखेने गुन्हे दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.