आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जंक्शन स्थानकावरून मुंबई, बडनेरा, कटनी, सुरत मार्गावर २४ तासात प्रत्येकी एक मेमू धावत आहे. त्यामुळे जंक्शनवर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र, मेमूसह अन्य गाड्यांचे जनरल तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागते. लांब रांगेमुळे अनेकदा प्रवाशांची गाडी चुकते. जंक्शनवरील पाच तिकीट व्हेंडींग मशीन बंद असल्याने ही समस्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट व्हेंडींग मशीन सुरू करावे, अशी मागणी होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लॉकडाऊनपुर्वी रेल्वे प्रशासनाने तिकिट व्हेंडींग मशीन सुरु केल्या होत्या. मात्र, केला सायडिंगकडील दोन आणि मुख्य प्रवेशद्वाराकडील तीन अशा पाच मशीन सध्या बंद आहेत. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि रात्री जनरल तिकीटासाठी खिडकीवर गर्दी होते. त्यामुळे तिकीट व्हेंडींग मशीन सुरू करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
मशीनमध्ये तांत्रिक बदल करावा तिकीट खिडकीजवळ लावण्यात आलेल्या तिकीट व्हेंडींग मशीनमधून एक्स्प्रेस गाड्यांचेही जनरल तिकीट मिळते. मात्र, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना जनरल डबे नाहीत. त्यामुळे अशा गाड्यांचे प्रवासी मशीनवरून जनरल तिकीट काढून, आरक्षित डब्यात बसतात. म्हणून केवळ पॅसेंजर आणि मेमूच्या वेळेतच तासभर आधी मशीन सुरू करावे, तसेच मेमू आणि पॅसेंजर गाडी सुटल्यास मशीन बंद करावे, अशी मागणी आहे. तसेच मशीनमधून केवळ पॅसेंजर आणि मेमूचेच तिकीट मिळेल, असा बदल केल्यास समस्या सुटेल.
२४ तासांत एकच मेमू, गाडी चुकल्यास दिवस वाया एका मार्गावर २४ तासांत एकच मेमू गाडी धावते. त्यामुळे सकाळी बडनेरा, नाशिक, कटनी, सुरत, नंदूरबार या गाड्यांना माेठी गर्दी असते. या गाड्यांच्या वेळेत तिकिटांसाठी मोठी रांग लागते. त्यामुळे ऐनवेळी रांगेमुळे अनेक प्रवाशांची गाडी चुकते. त्यांना दुसऱ्या दिवशीच गाडी असल्याने, प्रवाशांचा एक दिवस वाया जातो. अन्यथा त्यांना बसने प्रवास करण्यासाठी भाड्याचा भुर्दंड बसतो. यामुळे तिकीट वेडींग मशीनचा पर्याय मिळणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.