आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीओंचा झाला मृत्यू:धुके, वाहनाच्या उजेडात दिसला नाही झाकलेला ट्रक, त्यामुळेच अपघात

यावल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘साहेब भुसावळ शहरात मुक्कामाला थांबले होते. यानंतर आम्ही पहाटेच शासकीय वाहन घेऊन नाशिकसाठी निघालो. धरणगाव-अमळनेर रस्त्यावर पहाटे ५.१५ ते ५.२० वाजेदरम्यान आमच्या वाहनाचा अपघात झाला. रस्त्यावर असलेले धुके, समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यांचा उजेड आणि रस्त्याच्या अर्धवट भागात लावलेल्या ट्रकला ताडपत्रीने झाकल्याने तिचे रिफ्लेक्टर दिसले नाही. यामुळे दुर्घटना झाली’, अशी आपबिती बीडीओंचे वाहन चालक रुबाब तडवी यांनी सांगितली. अन् साहेबांसोबत चहा घेण्याचे राहूनच गेले.. भुसावळ येथून पहाटे ४ वाजता निघाल्यावर बीडीओ चौधरींनी चालक रुबाब यांना आपण नहाटा चौफुलीवर चहा घेऊ असे सांगितले. पण, नाहाटा चौफुली व पुढे जळगावात देखील चहाची दुकाने उघडी नव्हती. त्यामुळे त्यांनी धरणगावला चहा घेण्याचे सांगत जुन्या चित्रपटातील गाणी लावली. पण, धरणगावातही चहा मिळाला नाही. यावेळी साहेबांनी हसतच, जाऊ दे नशिबात चहा नाही वाटतं. पण आपण अमळनेरात चहा घेऊ असे सांगितल्याचे तडवी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...